Saturday, 1 June 2013

A poem by Mr Damodar Kare

I suddenly remembered a poem, which is from my 'Marathi textbook' of 1st or 2nd class. It is quiet great to remember such old poems from childhood. :P 






वाटते सानुली मजला मंद झुळूक मी व्हावे,
घेईल ओढ तिकडे स्वैर झूकावे,
कधी बाजरी, तर कधी नदीच्या काठी,
वेळूत कधी वा पडक्या वड्यापाठी…


vatate sanuli majala mand zuluk mi vhahe,
gheil odh mann tikade swair zukave,
kadhi baajari tar kadhi nadichya kathi,
velut kadhi va padakya vadya pathi…






Anyone does know full poetry? 


10 comments:

  1. वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
    घेइल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

    कधी बाजारी तर कधी नदिच्या काठी
    राइत कधी वा पडक्या वाड्यापाठी

    कधी थबकत जावे हळु कानोसा घेत
    कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

    लावुन अंगुली कलिकेला हळुवार
    ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार

    परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
    तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

    वेळुच्या कुंजी वाजवुनी अलगुज
    कणसांच्या कानी सांगावे हितगुज

    दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
    टवटवी मुखावर आणावी बिलगोनी

    स्वछंद अशा ह्या करूनी नाना मौजा
    घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

    ReplyDelete
  2. अजून एक कडवे

    गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
    झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
    शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
    खुलवीत मखमली, तरंग जावे गात

    कवी - दामोदर कारे


    ReplyDelete
  3. कवितांची आवड शाळेतल्या अगदी शेवट-शेवटच्या वर्षांत लागली. त्यामुळे कवितांचा खरा आस्वाद घेईस्तोवर शाळेतून पूर्णपणे बाहेर पडलेलो होतो. कालांतराने ५ वी- ६ वीतल्या काही कविता अचानक स्मरल्या पण कधी कुठे शब्द नीट आठवे नात तर कधी चारच ओळी आठवायच्या तर कधी कवीचे नाव स्मरे ना. त्यात भर घालायला अभ्यासक्रम बदलल्यामुळे शाळेतील त्या कविता आयुष्यातून हरवल्या त्या कायमच्याच. खूप शोधून पाहिले.

    आज तुमचा ब्लॉग पाहून खूप-खूप बरं वाटलं. गेली कित्येक वर्षे मी ज्या कविता शोधत होतो त्या आज इथे मिळाल्या. 'झुळूक मी व्हावे' आणि कुसुमाग्रजांची 'सागर' ह्या दोन कविता मी बऱ्याच ठिकाणी शोधल्या पण कधी मिळाल्याच नाहीत. आज इथे सापडल्यावर हरवलेले गवसल्यासारखे वाटले.

    शतशः धन्यवाद.

    - दुर्गेश नाडकर्णी

    ReplyDelete
  4. Pranav

    Thank you so much. Balpan parat ekda hatat diles.

    Vijay

    ReplyDelete
  5. Thanx a lot!!! those golden permanent memories!!!! Now i can enjoy entire poem!!!! this is one of my favourite poem!!!!

    ReplyDelete
  6. Shabdat Sangta yenar nahi asa anand zala !! Balpana parat bhetlyasarkhe vatale...gele te divas ..

    ReplyDelete
  7. Khupp chann vatla , june divas aathavle .. thank you so much..

    ReplyDelete
  8. https://www.youtube.com/watch?v=pMJaxVBLhhc&feature=share

    ReplyDelete
  9. This poem will always be cherished!
    Kavitetli shabdanchi rachna man agdi halka karte.....farach thodya kavita manala bhidtat ani hi tyatli ek ahe...

    ReplyDelete
  10. एकदम शाळेच्या वर्गात बसल्याची जाणीव झाली्. त्यावेळी न कळलेला अर्थ आज गवसला. खेड्यात वाढलेल्या प्रत्येक परकरी मुलीच्या उस्फूर्त भावना किती तरलपणे मांडल्या आहेत या कवितेत.
    नदी शेतं शाळा बाजार डोळ्यासमोर उभं राहिलं. मी माझ्या लहानपणीचे संपूर्ण जुन्नर गांव भटकून आले.
    संजीवनी साठ्ये
    पूर्वाश्रमीची संजीवनी परांजपे.

    ReplyDelete